एक्साईजच्या कारवाईत खासगी लोकांचा सहभाग विभागासह जिल्ह्यात चचेर्ला उधाण
सांगली : सांगलीतील राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने नुकतीच जत-नागज फाट्यावर गोवा बनावटीची नऊ लाख रूपये किमतीची दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाने गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. मात्र जत-नागज फाट्यावर केलेल्या कारवाईत एक्साईजमधील अधिकारी, कमर्चाऱ्यांसह काही खासगी लोकांचा सहभाग होता अशी चचार् आहे. या विभागाने माध्यमांमध्ये दिलेल्या छायाचित्रात या खासगी व्यक्तींचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे.
गोवा बनावटीच्या दारूवरीलर कारवाईत हे खासगी व्यक्ती कसे आले असा प्रश्न असा उपस्थित केला जात आहे. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्कच्या कायार्लयांमध्ये खासगी व्यक्ती कायर्रत आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विभागातील अधिकारी, कमर्चारी त्यांना झिरो नावाने ओळखतात. जत तालुक्यातील या कारवाईत खासगी व्यक्ती म्हणजेच एक्साईजकडील झिरोंनी महत्वाची भूमिका बजावली का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. माध्यमांमध्येही या झिरोंच्या छबी झळकल्याने चचेर्ला उधाण आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.