Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊत यांना राहुल गांधींचा फोन..

संजय राऊत यांना राहुल गांधींचा फोन..


काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत खूप व्यस्त आहेत. तरीही राहुल गांधी यांनी मला फोन केला व माझ्या तब्येतीची विचारपूस केली. खूप प्रेमाने ते बोलत होते. आम्हाला कायमच तुमची काळजी राहिली. आता तुम्ही बाहेर आला आहात तर तब्येतीची काळजी घ्य़ा. आपण पुन्हा एकदा काम करू. राजनितीत एकप्रकारची कटुता आली आहे. मित्र देखील दूर पळतायत. राहुल असे व्यक्ती आहेत जे राजकीय मतभेद असतानाही. मैत्रीचे प्रेमाचे संबंध कायम ठेवतात. 

त्यामुळेच भारत जोडो यात्रेला पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांच्या बोलण्यात प्रेम आणि गोडवा दिसतोय. त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतायत. माझे इतर पक्षातही मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे. पण त्यातल्या किती जणांनी विचारलं की तुम्ही कसे आहात? किती लोकांनी माझ्या कुटुंबीयांची विचारपूस केली? आमच्या पक्षातील नेते, ठाकरे कुटुंबीय, पवार साहेब, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही मित्रांनी चौकशी केली.आमचे मित्र भाजपातही आहेत. पण ते तर खूष होते मी तुरुंगात गेल्यावर. एका खोट्या प्रकरणात अडकवून आपल्या राजकारणातील सहकाऱ्याला तुरुंगात टाकलंय, असं किती जणांना वाटलं. असं असतानाही राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी माझी चौकशी केली. ही आपली परंपरा आहे राजकारणाची', असे संजय राऊत यांनी सांगितले.

'भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय.' असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.