शिंदे गटातील खासदाराचा पुन्हा एक गौप्यस्फोट...
मुंबई: बुलडाणा जिल्ह्याचे शिंदे गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटातील 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात 100 टक्के येतील असा दावा त्यांनी केला आहे.
गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील तसे शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट यापूर्वी केला होता. त्या अनुषंगाने या खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.