Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कणर्बधिरांवरील शस्त्रक्रियेत सांगली जिल्हा अव्वल जिल्हा शल्य चिकित्सक डॅ. साळुंखे यांचे विशेष योगदान

कणर्बधिरांवरील शस्त्रक्रियेत सांगली जिल्हा अव्वल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांचे विशेष योगदान



सांगली : सांगली जिल्ह्यातील कणर्बधीर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात सांगली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. क्वांक्लियर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॅ. संजय साळुंखे यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यामुळेच तब्बल १३ कोटी रूपयांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. 

ऐकू न येणाऱ्या व्यक्तीवर क्वांक्लियर इम्प्लांट ही १५ ते २० लाख रूपये खचार्ची शस्त्रक्रिया केली जाते. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कायर्क्रमातून १३० बालकांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या सवर् बालकांवर मिशन ध्वनीअंतगर्त मुंबईत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॅ. संजय साळुंखे यांनी सरकारी नियम पाळत या सवर् शस्त्रक्रिया करण्यात यश मिळवले.

कणर्बधीरांना ऐकू येत नसल्याने शब्द समजत नाहीत. त्यामुळे ती मुकी होतात. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना ऐकू येऊ लागले. परंतु शब्दच माहिती नसल्याने त्यांचे बोलणेच खुंटते. त्यासाठी स्पीच थेरपी राबवावी लागते. सांगलीतील शासकीय रूग्णालयात डीईआयसी थेरपीमध्ये सातत्य ठेवण्यात आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आलेली सवर् बालके आता बोलू लागली आहेत. राज्यातील एकून २४० बालकांवर मुंबईत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील १३० बालकांचा समावेश होता. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून सवर्च शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. सांगलीतील डीईआयसीची कामगिरीही उल्लेखनीय ठरल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॅ. संजय साळुंखे यांनी सांगली दपर्णशी बोलताना सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.