Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगप्रसिद्द रांगोळीकार कला शिक्षक अजितराव घोरपडे विदयालय कळंबी श्री.आदम आली मुजावर सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार.

जगप्रसिद्द रांगोळीकार कला शिक्षक अजितराव घोरपडे विदयालय कळंबी श्री.आदम आली मुजावर सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार. 


राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार. बालगंधर्व नाट्यमंदिर,पुणे येथे  चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे शुभ हस्ते तसेच आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड व माजी खासदार राजू शेट्टी.इतिहासकार.डॉ. श्रीमंत कोकाटे आजम कॅम्पसचे संस्थापक डॉ. पी. ए. इनामदार. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. 

महात्मा फुले इतिहास अकादमी,पुणे यांनी या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातुन त्य  विशेष निवड केली होती. कला क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक विश्वविक्रम नोंदवलेले आहेत. रांगोळी मध्ये विश्वकर्म करणारे ते पहिले भारतीय आहेत. गेली दोन दशके त्यांनी रांगोळीतून खूप मोठ मोठ्या रांगोळ्या रेखाटन केले आहेत. त्यांच्यामुळेच रांगोळी ही जगप्रसिद्ध झाली. रांगोळीतून इतके मोठे व्यक्तीचित्र रेखाटता येते हे त्यांनीच जगाला दाखवून दिले. कोणाच्या काळामध्ये त्यांनी अनेक महामानवांची पेंटिंग केले होते त्याच्या विक्रीतून 51 हजाराचा निधी मुख्यमंत्री सुपूर्द केला आहे. 2017चा त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. कला क्षेत्रामध्ये रांगोळी चित्रकलेनतेने अनेक प्रदर्शने भरून त्यांनी सामाजिक कार्य केले.

राष्ट्रीय एकात्मता बेटी बचाव पर्यावरण बचाव. त्यांच्या हातून अनेक अनेक विश्वविक्रमाची नोंद आहे. पेंटिंग विक्रीतून मिळणारे पैशातून त्यांनी दहा मुले दत्तक घेतली आहेत. एक वर्षाचा शैक्षणिक खर्च ते त्या मुलांना करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत कलेतील विद्यार्थी घडले आहेत. अनेक विविध क्षेत्रांमध्ये त्यांची योगदान आहे. त्यांच्या या सर्व कार्याचा विचार करून त्यांना हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त हा विशेष पुरस्कार देण्यात आला. जगप्रसिद्द रांगोळीकार कला शिक्षक अजितराव घोरपडे विदयालय कळंबी श्री.आदम आली मुजावर सर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार. सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर,पुणे येथे सकाळी ११.३० वाजता चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे शुभ हस्ते तसेच आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. महात्मा फुले इतिहास अकादमी,पुणे यांनी या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातुन त्यांची  विशेष निवड केली होती.

!!हार्दिक अभिनंदन..!!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.