"श्रद्धाचे 35 तुकडे केले, आफताबचे 500 तुकडे करा", साध्वी प्राची यांचे विधान
दिल्लीत आफताबने श्रद्धा वालकर तुकडे केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यातच गेल्या मंगळवारी आणखी एक दुसरी घटना उत्तर प्रदेशमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली. येथील निधी गुप्ता हिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी सुफियानवर निधीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी श्रद्धा हत्याकांड आणि निधी गुप्ता प्रकरणासंदर्भात विधान केले आहे. "हिंदूंनी एकजूट व्हा. कान उघडून ऐका. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, त्याचेही 500 तुकडे करा, त्यानंतर मार्ग सापडेल. दुसऱ्या दिवशी निधी गुप्ता मृतावस्थेत सापडणार नाही", असे पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी प्राची म्हणाल्या.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलांशी मैत्री करण्यास आणि प्रेम करण्यास साध्वी प्राची यांनी सक्त विरोध केला. यासोबतच त्यांनी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आल्या, जेणेकरून कोणताही जिहादी तिला आपल्या तावडीत अडकवू नयेत. साध्वी प्राची म्हणाल्या की, "भारतात अत्यंत सुनियोजित षडयंत्र रचले जात आहे. इथे हिंदू मुलींना कसे अडकवले जाते, त्यांच्यासोबत लव्ह जिहाद केला जातो. ही एक श्रद्धा नाही, कधी निधी गुप्ता येते तर कधी श्रद्धा येते. अशा घटना फक्त हिंदू मुलींसोबतच का होतात? तर हिंदू मुलंही मुस्लिम मुलींशी लग्न करतात. आजपर्यंत भारतात त्याच्यासोबत अशी एकही घटना समोर आलेली नाही."
आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी आपल्याला कायदा हातात घ्यावा लागेल, पण आपल्या मुलींचे रक्षण करा. त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी जिहादी आपल्या मुलीला आपल्या तावडीत अडकवत नाहीत ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मी प्रत्येक पालकांना आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करेन, असे याचबरोबर, प्राची म्हणाल्या. तसेच, हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेम करू नये. जर तुम्हाला प्रेम असेल तर ते तुमच्या पालकांसोबत करा. आपल्या मुलीने आकाशात झेप घ्यावी, असे प्रत्येक वडिलांना वाटते. पण आकाशात अनेक गरुड आहेत. त्यांच्यावर प्रेम करू नये. हे लोक जाहिल आहेत, असे मी उघडपणे सांगते, असेही साध्वी प्राची म्हणाल्या.
याचबरोबर, आफताबबाबत साध्वी प्राची म्हणाल्या की, भारतीयांनी कान उघडून ऐकावे. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्या, जिथे आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले आहेत, तिथे 500 तुकडे करा, मार्ग सापडेल. दुसऱ्या दिवशी निधी गुप्ता मृतावस्थेत सापडणार नाही. दरम्यान, यावेळी साध्वी प्राची यांनी उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर मदरशांवर बुलडोझर चालवा किंवा ठिकाणी सरकारी रुग्णालय बांधण्याची मागणी सरकारकडे केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.