जिल्ह्यात 23 ते 30 नोव्हेंबर कालावधीत भूजल सप्ताह
सांगली दि. 21, : जिल्ह्यात दि.23 ते 30 नोव्हेंबर 2022 कालावधीत भूजल सप्ताह राबविण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या 5 तालुक्यातील 95 गावांत भूजल सप्ताहमध्ये शालेय विद्यार्थांच्या, महिलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयामार्फत देण्यात आली.
सप्ताहामध्ये लोकसहभागातून भूजलाचे महत्व, पाण्याचे व्यवस्थापन या बद्दल जनजागृती करण्यात येणार असून, लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. भूजलाच्या प्रभावी व्यवस्थापनाकरीता लोकसहभाग अत्यंत आवश्यक असून या सप्ताहात भूजल संबंधी विविध घटकांची प्रात्यक्षीके तसेच उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.
भूजल सप्ताह दरम्यान राबविले जाणारे उपक्रम
* शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, जल प्रतिज्ञा, चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा इ.
* शाळामध्ये भूजलासंबधी माहिती पट दाखवणे.
* महाविद्यालयीन स्पर्धा / व्याख्यान.
* गावातील सर्व स्त्रोतांचे पाणी परीक्षण करणे.
* माती परीक्षण करणे.
* भूजल पातळीच्या नोंदी अद्ययावत करणे.
* जलस्त्रोतांची स्वच्छता करणे.
* फिल्ड किटच्या सहाय्याने पाणी परीक्षण करणे.
* जलस्त्रोतांचे पूजन करणे.
अटल भूजल योजनेबाबत गावातील विविध पातळीवर ग्रामस्थ, महिला, सामाजिक संस्था यांच्या बैठका घेवून भूजलाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. जल सुरक्षा आरखड्याच्या माध्यमातून भूजलची घसरण थांबविणे व भूजल पातळीत वाढ करणे या करीता खालील प्रमाणे उपायायोजनाची माहिती गावस्तरावर देण्यात येणार आहे, असेही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सांगली कार्यालयाकडील प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.