शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला
सांगली दि. 21, : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
या परीक्षेसाठी दि. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत नियमित शुल्कासह, 16 ते 23 डिसेंबर 2022 कालावधीत विलंब शुल्कासह तर 24 ते 31 डिसेंबर 2022 कालावधीत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.