विद्युत उपसायंत्र परवाने वारसाहक्काने वर्ग व नुतनीकरण करण्याचे आवाहन
सांगली, दि. 30, : कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) अंतर्गत 31 डिसेंबर 2019 पूर्वी विद्युत उपसायंत्र परवाना मंजूरी घेतलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व मिरज तालुक्यातील सर्व लाभधारक बागायतदार, सहकारी पाणी पुरवठा संस्था, पाणीवापर संस्था तसेच बिगरसिंचन मयत परवानाधारकांच्या वारसदारांनी सदरचे परवाने आपल्या नावे वर्ग करून घ्यावेत. अन्यथा असे परवाने शासन निर्णयानुसार रह करण्यात येतील. तसेच ज्या बागायतदारांचा / ग्राहकांचा विद्युत उपसायंत्र परवाना ३१ डिसेंबर २०१९ अखेर कार्यान्वित झालेला नाही असे विद्युत उपसायंत्र परवाने नूतनीकरण करून घ्यावेत. परवाना वर्ग अथवा नुतनीकरण करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ असून त्यानंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही. सदर सेवा ही विनामूल्य असल्याने या सेवेचा लाभ जास्तीत जास्त परवानाधारकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.