मी दोन्ही दसरा मेळाव्याची भाषणं ऐकणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
मुंबई 04 ऑक्टोबर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री काळा चौकी येथील मराठी दांडियाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. यंदा शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोघांचाही वेगवेगळा दसरा मेळावा होणार आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही.
त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, की दोन्ही दसरा मेळावा अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले. यासोबत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, की सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे.
भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदा त्याचं काम करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी चित्त्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की चित्ता कुठून आलेत, हेही नाना पटोलेंना नीट माहिती नाही. चर्चेत राहण्यासाठी नाना असं वक्तव्य करीत असतात. नाहीतर त्यांना कोणीच विचारणार नाही, म्हणून चर्चेत राहण्यासाठी ते हे करतात. त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.