मुंबई विमानतळावर ३५ कोटीचं ड्रग्ज जप्त;कस्टम विभागाची मोठी कारवाई
मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ३५ कोटी रुपयांचं ड्रग्ज आढळलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई ही ड्रग्ज तस्कारांचा अड्डा तर होत नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने खूप मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने तब्ल 35 कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. एका विदेशी नागरिकाने हे ड्रग्ज विमानतळावर आणले होते. त्याच्या सूटकेसमध्ये हे ड्रग्ज सापडले आहेत. तो ट्रॉली बॅगमध्ये लपवून ड्रग्ज भारतात आणत होता. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चोरी पकडली. आरोपी विदेशी नागरिकाच्या बॅगेत पाच किलो हाय क्लालिटीचे हेरॉईन सापडले आहे. या हेरॉईनची किंमत 35 कोटी रुपये इतकी आहे.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 35 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच आरोपी विदेशी नागरिकाला देखील बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हे ड्रग्ज नेमके कुठून घेऊन आला? तो कुणाला ते ड्रग्ज देणार होता? तो नेहमी अशाप्रकार ड्रग्ज घेऊन आणायचा का? ड्रग्जचा काळाबाजार करणारी त्यांची गँग आहे का? तो भारतात नेमकं कुणासाठी ड्रग्ज घेऊन आला होता? तो ते ड्रग्ज नेमके कोणाला विकणार होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नावर आरोपी नेमकं काय जबाब देतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.