लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण न झालेल्या जनावरांना सांगली जिल्ह्यात प्रवेशास मनाई - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
साखर कारखान्यांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना
सांगली, दि. 30, : गाय व म्हैस वर्ग पशूधनातील लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक उपायोजना राबविण्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊस तोड मजूरांसोबत असणाऱ्या जनावरांचे लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक असून असे लसीकरण प्रमाणपत्र संबधित पशू वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून विहित नमुन्यात प्राप्त करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण केले नाही. अशी जनावरे सांगली जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील साखर काराखन्यांच्या आवारामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच याबाबत सर्व साखर कारखान्यांनी खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातून या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व ऊस तोड मजूरांची यादी सर्व साखर कारखान्यांनी जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त सांगली, जिल्हा परिषदेचे पशूसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्राधान्यांने तात्काळ सादर करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आदेशित केले आहे.
साखर कारखान्यांच्या आवारात आलेल्या जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रसार होऊ नये म्हणून साखर कारखाना ज्या कार्यक्षेत्रात त्या कार्यक्षेत्रातील तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी, पशू पर्यवेक्षक यांनी साखर कारखान्यास नियमीत भेट देऊन सदर जनावरांची वैद्यकीय तपासणी करुन लम्पी चर्मरोगाच्या प्रसार होणार नाही याची दक्षता घ्यावी. साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या जनावरांना लम्पी चर्मरोगाव्यतिरिक्त इतर आजार झाल्यास त्यावर उपाय योजना करण्यासाठी संबंधीत साखर कारखाने पशुसंवर्धन अधिकारी/पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करतील. साखर कारखाना आवारात असलेल्या जनावरांचा विमा उतरविला असल्यास संबंधीत विमा कंपन्यानी याबाबत आवश्यकता पडल्यास पुढील योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. तसेच या आदेशाची अंमलबजावणी चेअरमन/कार्यकारी संचालक, साखर कारखाने, प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागीय कार्यालय कोल्हापूर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पोलीस अधिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी असे आदेशित जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातून बाहेरिल जिल्ह्यात जाणाऱ्या पशुधनाचे सांगली जिल्ह्यात लसीकरण करण्यात आल्याचे विहित नुमन्यातील प्रमाणपत्र देण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबधित यंत्रणेला सुचित केले आहे. याबरोबरच परजिल्ह्यातील सांगली जिल्ह्यात येणाऱ्या पशूधानाचे लसीकरण प्राधान्यांने करण्यात यावे. तसेच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत अन्य जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या यंत्रणेस सूचित करावे. याबद्दल त्यांना विनंती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.