“फिट इंडिया फ्रीडम रन” : सांगलीत रविवारी तीन किलोमिटर धावणे उपक्रम
सांगली, दि. 30, : युवा व खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये “फिट इंडिया फ्रीडम रन” 3 किलोमिटर धावणे हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यावतीने दि. 2 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता 3 किलोमिटर धावणे / चालणे हा उपक्रम पुष्पराज चौक ते अशोक कामटे चौक (वसंत बंगला) व परत पुष्पराज चौक या मार्गावर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाट क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.
महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त दि. 2 ऑक्टोंबर रोजी संपुर्ण राज्यामध्ये आझादी का अमृत महोत्सव फिट इंडिया फ्रिडम रन 3 किलोमिटर धावणे हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दि. 2 ऑक्टोंबर 2022 रोजी Plog Run याचे आयोजन करण्यात येणार असून त्या निमित्ताने स्वच्छता आणि तंदुरुस्ती या दोन्ही बाबी एकत्रीत साधण्याकरिता धावणे/ जॉगिंग करत धावणे या वेळी रस्त्यांत दिसणारा हाताने उचलता येतील असे कागदाचे कपटे/ कचरा उचलून कचऱ्याच्या पिशवित गोळा करुन स्वच्छता करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तिनी फिट इंडिया पोर्टलवर www.fitindia.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन वैयक्तिक माहिती (स्वत: धावल्याची माहिती संबंधितांनी सदर विंडोमध्ये (नांव, ई-मेल, संपर्क क्रमांक, धावण्याची तारीख, अंतर, राज्य, जिल्हा, गट/ब्लॉक तसेच अंतर धावलेली / चाललेली माहिती त्यांचे ॲपवरुन सदर टेबलमधून अपलोड करावयाची आहे). प्रत्येकजण धावण्यासाठी / चालण्यासाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तिश: अनुकूल वेळ निवडू शकतात. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊनही धावणे / चालणे करु शकणार आहेत. प्रत्येकास स्वत:च्या वेगाने धावणे / चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावलेल्या / चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येणार आहे.
“धावणे” हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. त्यास नेहमी तंदुरुस्ती (फिटनेस) नियमित व्यायामाची आवश्यकता असते. नियमित व्यायामाकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वांना लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, आजार इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी मदत करण्यासाठी युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेऊन “फिट इंडिया फ्रीडम रन” हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमात सर्वांनी व्यापक प्रमाणात सहभाग घेऊन शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.