Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन

राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्ड्यांबाबत टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन


सांगली, दि. 30,  : 
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे. हा दूरध्वनी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. नागरिकांना जर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे चे सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.

तक्रार नोंदविताना संबंधितांनी त्यांचे नाव व  दुरध्वनी क्रमांक नोंदवावा. जेणेकरून तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल कळविणे शक्य होईल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी www.mahapwd.com या संकेतस्थळावर 'Citizen' या भागात 'Pothole Related Complaint मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते वापरात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.