Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका सभागृह नेते पदी सौ. भारतीताई दिगडे यांची निवड

महापालिका सभागृह नेते पदी सौ. भारतीताई दिगडे यांची निवड


सांगली महानगरपालिकेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सौ. भारतीताई दिगडे यांची सभागृह नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. सर्व नगरसेवक आणि कोअर कमिटीची बैठक होवून त्यामध्ये एकमताने हा निर्णय झाला- याप्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, पुढच्या वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. राहिलेल्या आठ महिन्यात वार्डातील सर्व कामे मार्गी लागतील असा प्रयत्न सर्व नगरसेवकांनी केला पाहिजे. यासाठी सभागृह नेता म्हणून सौ. भारतीताई दिगडे  यांचा पक्षातील आणि नगरपालिकेतील अनुभवाचा सर्व नगरसेवकांनी करून घ्यावा. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून ५१ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील असा मला विश्वास वाटतो"


याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य  शेखर इनामदार, नीता केळकर, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांनी मनोगत व्यक्त करून भारती दिगडे यांना शुभेच्छा दिल्या. माजी सभागृह नेते विनायक सिंहासने यांनी आभार मानले. यावेळी  ज्येष्ठ नेते तात्या बिर्जे, भाजपा प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे आणि सर्व भाजपा नगरसेवक उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.