मर्सिडीज बेंझचे सीईओचा वाहतूक कोंडीमुळे पुण्यात रिक्षाने प्रवास
पुणे : पुणे म्हटलं की वाहतूक कोंडी आलीच मग इथं मर्सिडीजचे सीईओ असो किंवा एखादा रिक्षा चालक दोघांनाही तेवढाच वेळ लागतो कारण हे घडलं आहे. पुण्यातील वाहतूक कोडींचा फटका कुणाला कसा बसेल काही सांगता येत नाही. मर्सिडीज बेंझचे सीईओ मार्टिन श्वेंक यांना याचा फटका बसला आहे. याबाबत त्यांनी इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. वाहतूक कोंडीनंतर श्वेंक यांनी गाडीतून बाहेर पडत रिक्षाने प्रवास केला. सध्या ही पोस्ट शहरात चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या वाहतूक कोंडीचा फटका बसला होता.
मर्सिडीज बेंझचे सीईओ मार्टिन श्वेंक यांची इस्टाग्राम पोस्ट
श्वेंक हे 2018 पासून मर्सिडीज-बेंझ इंडियाचे सीईओ आहेत. त्यापूर्वी त्यांनी मर्सिडीज-बेंझ चीनचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले आहे. 2006 पासून ते या ब्रँडशी जोडलेले आहेत. मार्टिन श्वेंक यांनी 29 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुमची एस-क्लास पुण्यातील सर्वोत्तम रस्त्यांवर अडकली तर, तुम्ही काय कराल? कदाचित गाडीतून उतरून काही किलोमीटर चालत जाल किंवा रिक्षा घ्याल? या इन्स्टापोस्टला आतापर्यंत जवळपास सातशे लाईक्स,शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.