जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची उषःकाल अभिनव हॉस्पीटलला सदिच्छा भेट...
शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी: अभिनेते प्रशांत दामले यांनी उष:काल अभिनव मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली येथे भेट दिली.या प्रसंगी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ.संजय कोग्रेकरांच्या हस्ते प्रशांत दामलेंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मिलिंद परीख यांच्या हस्ते शाल आणि खास स्मृतीचिन्ह देऊन दामलेंचा सत्कार करण्यात आला. प्रशांत दामले यांनी हॉस्पिटलच्या विविध विभागांना भेट दिली. विभागातील अद्ययावत तंत्रज्ञान, कामकाज यांची पाहणी केली. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना आपुलकीने दिली जाणारी सेवा, कमी खर्चात प्रभावी उपचार देण्याच्या हॉस्पिटलच्या उद्दिष्टाला त्यांनी मनभरून दाद दिली. दामले यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व हॉस्पीटलमधील सोयी - सुविधा पाहून समाधान व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.