मांग गारुडी समाजाचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाकडून घेतलेले थकित कर्ज माफ करावे भारत चौगुले व सौ.विद्याताई उत्तमराव कांबळे
सांगली दि-०१/१०/२०२२: मांग गारुडी समाजाचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ कडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे या मागण्याचे निवेदन मांग गारुडी समाजाचे अध्यक्ष भारत चौगुले व माजी समाज कल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापक क्षीरसागर साहेब यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले कोरोना लॉकडाऊन काळात नागरिकांना व्यवसाय बंद असल्यामुळे सदरचे कर्ज भरता आले नाही तरी सदरची कर्ज माफ करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी समशेर चौगुले, प्रवीण चौगुले, वर्गेश लोंढे, राहुल लोंढे, प्रवीण लोंढे आदी मांग गारुडी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.