Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांचे अनुदान त्वरित वितरित करा व इतर सुविधा द्या...

स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांचे अनुदान त्वरित वितरित करा व इतर सुविधा द्या...


     -रिपब्लिकन पक्षाचे सचिव जगन्नाथ ठोकळे यांची मुख्यमंत्र्यांकडे  निवेदनाद्वारे मागणी  निवेदन...

सांगली :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वाधार योजना सन २०१६ पासून कार्यान्वित केलेली आहे.गेल्या दोन वर्षापासून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित अनुदानित वितरित केले जात नाही. त्यामुळे या  योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक हे खाजगी सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेऊन विद्यार्थ्यांना पाठवीत आहेत. त्यामुळे शासनाने स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांचे अनुदान त्वरित वितरित करावे या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करावी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करावेत,या व इतर योजनांची माहिती देणारे फलक शासकीय कार्यालयाबरोबरच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात,उपविभागीय  अधिकार व तहसीलदार कार्यालयात दर्शनी भागात लावावेत,शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतेवेळी ज्या अटी व नियम विद्यार्थ्यांना लागू आहेत त्याच अटी स्वाधार योजनेसाठी आहेत.

त्या शिथिल कराव्यात. रु.५००/- च्या स्टँम्पपेपर अँफिडेव्हिटची रद्द करुन साध्या पेपरवरील  अँफिडेव्हिट ग्राह्य मानावे या योजनेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटीबाबत ईमेल किंवा मोबाईल मँसेज व्दारा कळविण्यात यावे.महागाई निर्देशांकानुसार अनुदानामध्ये वाढ करावी या मागण्याबरोबरच इतर मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) पश्चिम महाराष्ट्र सचिव तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा.रामदासजी आठवले तसेच उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविलेली आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.