चांदणी चौक पुणे येथील पूल पाढण्यासाठी वाहनांसाठी पर्यायी मार्गाचे नियोजन
सांगली, दि. 30, : पुणे बेंगलोर महामार्गावर एन.डी.ए. चौक (चांदणी चौक) पुणे येथील अस्तित्वातील पूल अरूंद असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम प्रगतीत असून त्यासाठी जुना पूल पाडणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजीचे रात्री 11 वाजल्यापासून ते दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद करून दि. 2 आक्टोबर 2022 रोजीच्या पहाटे 2 वाजता जुना पूल स्फोटकांव्दारे पाडण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे शहरात जड वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आला असून इतर वाहनासाठी पुणे शहरातून पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस एस कदम यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.