Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रस्त्याच्या कामासाठी कुंडलफाटा ते पलूस शहर ते बांबवडे ते येळावीफाटा मार्ग चारचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना 3 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीस बंद

रस्त्याच्या कामासाठी कुंडलफाटा ते पलूस शहर ते बांबवडे ते येळावीफाटा मार्ग चारचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना 3 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर पर्यंत वाहतुकीस बंद


सांगली, दि. 1,  :  पलूस तालुक्यातील कुंडल ते बांबवडे या भागातील रस्त्याचे काम चालू करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दि. 3 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी कुंडलफाटा ते पलूस शहर ते बांबवडे ते येळावीफाटा हा मार्ग चारचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांना वाहतुकीस बंद करून त्यावरील वाहतुक कुंडलफाटा ते फॉरेस्ट ॲकॅडमीमार्गे ते बलवडी फाटा ते जुना सातारा रस्तामार्गे ते येळावी फाटा या अस्तित्वातील मार्गावरून वळविणे व वाहतुक सुरक्षा उपयायोजनाव्दारे वाहतुक नियंत्रित करण्याची अधिसूचना निर्गमित केली आहे.

जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर व पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांनी एकत्रितपणे कराव्यात. वाहतुकीत बदल करण्यात आलेली माहिती जनतेला होण्यासाठी शहरातील, गावातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी अधिसूचना तसेच वाहतूकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी. या निर्णयाची तात्काळ प्रभावी व संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.

कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करावयाचे असल्यास त्या ठिकाणी किमान 17 ते 18 मिटर एवढ्या रूंदीने जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कुंडल ते बांबवडे या भागांमध्ये साधारणत: 12 ते 15 मिटर एवढ्या रूंदीने जागा उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध असणारी जागाही अपुरी असल्याने सदर ठिकाणी काँक्रिट रस्त्याचे बांधकाम चालू असताना सदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवण्याकरीता आवश्यक असलेला पर्यायी रस्ता जागेअभावी तयार करता येणे शक्य नाही. त्यामुळे सदर कुंडल ते पलूस शहर ते बांबवडे या भागातील अस्तित्वातील रस्त्यावरील वाहतूकही अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कुंडलफाटा ते पलूस शहर ते बांबवडे ते येळावीफाटा अशी सध्या चालू असलेली राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी व त्यापेक्षा मोठ्या वाहनांची वाहतूक दि. 3 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 या कालावधीसाठी कुंडलफाटा ते फॉरेस्ट ॲकॅडमीमार्गे ते बलवडी फाटा ते जुना सातारा रस्तामार्गे ते येळावी फाटा या अस्तित्वातील मार्गावरून वळविण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.