मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीसाठी 2 ऑक्टोबरला विशेष मोहिम
सांगली, दि. 30, : निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक जोडणीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. विशेष मोहिमेंतर्गत रविवार, दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व मतदान केंद्रावर विशेष शिबीर मोहिम होणार आहे. त्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे मतदान केंद्रावर उपस्थित राहून अद्यापही आधार जोडणी न केलेल्या मतदारांची आधार जोडणी करून घेणार आहेत. सर्व मतदारांनी विशेष शिबिराच्या दिवशी आपल्या मतदान केंद्रावर जावून फॉर्म नंबर 6ब भरून द्यावा आणि आपली आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन 282 सांगली विधानसभा मतदार संघांचे मतदार नोंदणी अधिकारी आशिष बारकुल यांनी केले आहे. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने मतदार यादीतील तपशीलाशी आधार क्रमांक जोडता येतो. NVSP अथवा Voter Portal वर जाऊन मतदार आपले स्वप्रमाणीकरण स्वतः करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.