Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू


सांगली, दि. 1,  :
सांगली, मिरज, कुपवाड, बुधगाव या ठिकाणी दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2022 एकूण 41 हायस्कूल / महाविद्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटरच्या सभोवतालच्या परिसरात दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

या आदेशानुसार दि. 8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते दुपारी 2 या वेळेत सदर परीक्षेसंबंधित अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. सदर वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.