इंद्राणी मुखर्जीने 10 वर्षांनंतर भर कोर्टात दिली 'ही' कबुली, प्रकरणात मोठा ट्विस्ट
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबई सत्र न्यायालयात नवा खुलासा केला आहे. यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. आता या खुलास्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून आज राहुल मुखर्जी याची उलट तपासणी घेता वेळी हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
काय केला खुलासा?
इंद्राणीचे वकील अॅड रणजीत सांगळे यांनी विचारले की, शीना तुझी चुलत बहीण आहे हे माहिती झाल्यानंतरही तिच्यासोबत शारीरिक संबंध का ठेवले? या बाबत नैतिक दृष्ट्या तुला काहीच वाटलं नाही का ? यावर साक्षीदार राहुल मुखर्जीने सांगितलं की, इंद्राणी आणि माझे ब्लड रिलेशन नसल्यामुळे मी आणि शीना एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिपमध्ये राहिलो. 2015 पासून शीना ही माझी मुलगी नसून बहीण असल्याचा इंद्राणी मुखर्जी कडून दावा केला जात होता. मात्र आज इंद्राणीने शीना ही स्वतःची मुलगी असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी इंद्राणी मुखर्जीची दोन लग्न झाली आहेत. शीना ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी आहे. यानंतर इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीसोबत दुसरं लग्न केले. दरम्यान शीना आणि पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीपासूनच मुलगा राहुल मुखर्जीसोबत तिचे प्रेमसंबंध सुरू होते. हे इंद्राणीला खटकत होते. याच कारणातून तिने आपली लेक शीनाची हत्या केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र अजून ते सिद्ध झालेले नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.