नवरात्रौत्सवासाठी 1 ऑक्टोबर रोजी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सूट..
सांगली, दि. 30, : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडील व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने वर्षभरातील 15 दिवसांच्या मर्यादेत, नवरात्रौत्सवासाठी दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापरासाठी सुट देण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शासन निर्देशानुसार सांगली जिल्ह्यात नवरात्रौत्सवासाठी दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजीचे 6 वाजल्यापासून ते 23.59 वाजेपर्यंत ध्वनीची विहीत मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सूट दिली आहे.
ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास दिलेली सूट घोषीत शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. घोषीत शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिका आयुक्त, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.