Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी!

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी!


घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवं तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते. पण आता नव्या नियमांनुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात ठराविक म्हणजेच, केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत.

...म्हणून घेतला निर्णय

घरगुती एलपीजी सिलेंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलेंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच, याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅसचं रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या रिफिलहून महाग असल्यानं अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रीफिलचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यानं घरगुती एलपीजी सिंलेडरवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

आता केवळ 12 अनुदानित सिंलेंडर मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, तिनही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दरानं वर्षभरात फक्त 12 सिलेंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलेंडर घ्यावे लागतील.

वर्षाकाठी केवळ 15 सिलेंडर

नव्या नियमांनुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर एका महिन्यात फक्त दोनच सिलिंडर मिळणार आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तरच त्या ग्राहकाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.