उद्धव ठाकरेंकडून 'ती' चूक झाली, एकनाथ खडसेंनी सांगितले कारण
28 सप्टेंबर : 'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पण, त्यांनी विश्वास मताला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेकडून झालेल्या चुकीवर भाष्य केलं. तसंच, धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे, असंही खडसे म्हणाले. शिंदे गट बाहेर पडल्यानंतर नैतिकता म्हणून उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरे जाऊन अधिवेशनात संख्याबळाची चाचणी केली असती तर अधिक उचित ठरले असते असे देखील मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसंच, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठात उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला, मात्र आमदारांच्या अपात्रतेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे आयोगाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल.
शिवसेना हा जुना पक्ष असून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेला मिळावा ही अपेक्षा आहे. 16 आमदार अपात्र झाले तर हे सरकार कोसळू शकतं. असंही खडसे म्हणाले. तसंच, 'राज्यसभेत पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही मात्र विधानसभेमध्ये सुद्धा पंकजा मुंडे यांना हरविण्यात आलं.
ही खंत पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे जनतेच्या विकास कामासाठी जोपर्यंत माझे योगदान राहील तोपर्यंत माझा कुणीही पराभव करू शकत नाही' अशी भावना पंकजा मुंडे यांच्या मनात होती. व त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं' असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. 'मात्र मोदीजी सुद्धा माझा पराभव करू शकत नाही असं जर टीकेने म्हटलं असेल तर ते दुर्दैवी असून नरेंद्र मोदी यांचा अपमान करण्याची भावना पंकजा मुंडे यांची नव्हती असंही एकनाथ खडसे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षावर नाराज असणं हे स्वाभाविक आहे.
पंकजा मुंडे यांना न्याय मिळायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय होत असून मधल्या काळात पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाचे राज्य आणून देण्यामध्ये ज्यांचे योगदान राहिलं त्यांची जर उपेक्षा पक्षाच्या माध्यमातून होत असेल तर हे योग्य नसून पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही खडसे म्हणाले.
'शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत दुर्दैवी वक्तव्य केले आहे. त्यामुळे मराठा समाजासह इतरांच्या भावना दुखावल्या असून आरक्षण मागणं चूक आहे का असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान सावंत यांनी सशर्त माफी मागण्याऐवजी बिनशर्त माफी मागावी व पुढे असं वक्तव्य करणार नाही, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट करावे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.