सांगलीत कॉलेज तरूणाचा निर्घृण खून
सांगली : सांगली कर्नाळ रस्ता परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ राहणाऱ्या कॉलेज तरूणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अजित बाबुराव अंगडगिरी (वय १९) असे मृताचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पुर्वीच्या वादातून हे कृत्य झाले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृत अजित कर्नाळ रस्त्यावरील एका गर्डनजवळ राहण्यास आहे. तो सांगलीतील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेतो. त्याला फोटीग्राफीचाही छंद होता. त्याच्या वडिलांची घराजवळच पानपट्टी आहे. पद्माळे फाटा परिसरातून माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेत वाटणीने करण्यासाठी त्याच्या वडिलांनी घेतले होते. अजित आज शेतात औषध टाकण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याचे कुटुंबियही शेतातच होते. दुपारी चारच्या सुमारास तिघे तरूण दुचाकीवरून आले. पानपट्टीत अजित विषयी माहिती घेतली. त्यावेळी तो शेतात असल्याचे माहिती मिळाली. तिघे तरूण तिकडे गेले. त्यांनी अजितला बोलावून घेतले. त्यावेळी एकाने धारधार शस्त्राने अजित याच्या छातीवर एकच वार केला. त्यात अजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तिघेही पळून गेले. या हल्यात अजितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला सांगली सिव्हीलमध्ये नेण्यात आले. त्यापूवीर्च त्याचा मृत्यू झाला होता. रात्री उशीरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.