३३ कोटीची ६५.४६ किलो वजनाची ३९४ सोन्याची बिस्किटे जप्त
डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्तीच्या कारवाईतील सातत्य कायम ठेवत सुमारे ६५.४६ किलो वजनाची आणि ३३.४० कोटी (अंदाजे) रुपये किमतीची मूळ परदेशी सोन्याची ३९४ बिस्किटे जप्त केली आहेत. ईशान्येकडून त्याची तस्करी होत होती. मिझोराममधून विदेशी मूळ सोन्याची तस्करी करण्याचा आणि त्यासाठी देशांतर्गत कुरिअर पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक कंपनीचचा वापर करण्याची योजना एक टोळी आखत आहे, अशी खबर डीआरआयला मिळाली. तस्करी रोखण्यासाठी डीआरआयद्वारे ऑपरेशन गोल्ड रश ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईला नेल्या जाणारा, 'वैयक्तिक वस्तू' घोषित केलेल्या विशिष्ट माल अडवण्यात आला. १९ सप्टेंबर रोजी भिवंडी (महाराष्ट्र) येथे तपासणी केली असता सुमारे १९.९३ किलो वजनाच्या आणि सुमारे १०.१८ कोटी रुपये मूल्याच्या विदेशी मूळ सोन्याच्या बिस्किटांचे १२० नग जप्त करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.