नगररचनाची खाबुगिरी—भाग २
आयुक्तांच्या नावावर मागितली जाते माया नगररचनाच्या अधिकाऱ्यांचे धाडस वाढतेय
सांगली: मनपाच्या नगररचना विभागाची खाबुगिरी आता चव्हाट्यावर आली आहे. अड. चैतन्य कुलकणीर् यांनी दिलेल्या तक्रारीतून या विभागातील अधिकारी, कमर्चारी आयुक्तांच्या नावावर माया मागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्री. कुलकणीर् यांच्याकडून साडेसात लाखाची लाच घेतल्यानंतर ते याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार होते. नंतर घरपट्टी आणि पाणीपट्टीसाठी आयुक्तांनी कुलकणीर् यांची फाईल अडवल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापोटी तत्कालीन आयुक्तांना चार लाख रूपये द्यावे लागतील असे श्री. झगडे यांनी सांगितले. त्यापोटी त्यांनी दोन लाखांची लाचही जावेद मकानदार यांच्याहस्ते स्विकारली. श्री. कुलकणीर् लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची प्राथमिक मंजुरीची फाईल मंजूर करण्यात आली. त्यावेळी अंतिम मंजूरी देताना आणखी लाच घेणार नसल्याचे संबंधितांनी कबूल केले होते. मात्र नंतर आयुब पटेल यांच्यामाफर्त श्री. कुलकणीर् यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. नगररचनामधील अधिकाऱ्यांनीच पटेल यांना तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचा आरोपही अड. कुलकणीर् यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.