ना. सुरेशभाऊ खाडे महामंडळ अधिवेशन प्रमुख पाहुणे...
सांगली दि. २६: महाराष्ट्राचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या दि. २ ऑक्टोबर रोजी सांगलीत होणाऱ्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली. आज सांगली येथील निवासस्थानी जाऊन ना. खाडे यांना रावसाहेब पाटील, विनोद पाटोळे, प्रा. एन.डी.बिरनाळे व आर. एस. चोपडे यांनी त्यांना निमंत्रण दिले.
यावेळी ना. खाडे यांची सांगलीचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शुभेच्छा देताना प्रा. एन.डी.बिरनाळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्र स्तरावर मजूर मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयामुळे आज देशातील कामगारांना अधिकार व लाभ मिळतात. डॉ. बाबासाहेब हे देशाचे कामगार मंत्री होते आता आपण राज्याचे कामगार मंत्री आहात.. हे मंत्रीपद सर्वात महत्त्वाचे आहे. वंचित घाम गाळून पोट भरणाऱ्या घटकांना स्वातंत्र्याचे लाभ देणारे आहे.'' यावेळी रावसाहेब पाटील यांनी ना. खाडे यांना कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचा २०२१-२२ चा अहवाल दिला.संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ना. खाडे यांनी कौतुक केले. ना. खाडे यांच्या भेटीसाठी मोहन वनखंडे यांनी सहकार्य केले. यावेळी भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष दिपक बाबा शिंदे व सागर वडगावे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.