Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 


सेवाभावी संस्थाना सहयोगी संस्था म्हणून काम करण्यासाठी 3 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


सांगली, दि. 22  : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ज्या सेवाभावी संस्थाना सहयोगी संस्था म्हणून काम करावयाचे आहे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय (रोहयो शाखा), विजयनगर सांगली येथे दिनांक 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत  विविध निकषांच्या अनुषंगाने आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज दाखल करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो)  दिपक शिंदे यांनी केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध विकास कामे करण्यामध्ये प्रशासकीय संस्था यांची अखर्चिक भागीदारी स्पष्ट करण्यात आली आहे. मी समृध्द तर गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द या तत्वाने अनेक सेवाभावी संस्थांना अखर्चिक भागीदारीमध्ये समाविष्ठ करण्यात येत आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांना रोजगार उपलब करून टिकाऊ मालमत्ता करणे व त्यातून गरीबी निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करून ग्रामीण भागातील जनतेस समध्द करणे शक्य होईल.

सहयोगी संस्थांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सहयोगी संस्था म्हणून पुढील निकषांनुसार सहभागी करून घेता येईल. विना आर्थिक सहाय्याचे काम करण्याची तयारी असावी. शासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असावा. जलसंधारण किंवा सामुदायिक विकासाच्या नियोजन क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य. स्वयंसेवी संस्थांचे संघटन जिल्ह्यात असावे. स्वयंसेवी संस्था नीती आयोगाच्या NGO PS पोर्टल वर नोंदणीकृत नसल्यास त्यांना नोंदणी करण्यास प्रवृत्त करावे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.