लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सांगलीत लवकरच होणार - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र व ज्यांनी सात समुद्राच्या पलीकडे शालेय शिक्षण नसताना सुद्धा आपल्या बुद्धी कौशल्यावर अनेक कथा, कादंबरी,पोवाडे, लोकनाट्य, वगनाट्य व समाज परिवर्तन होईल अशा आशियाचे अनेक काव्यसंग्रह लिहिले व मातंग समाजाचे व बहुजन समाजाचे प्रबोधन करून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे सांगली जिल्ह्याचे थोर सुपुत्र, मातंग समाजाचे दैवत, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महा पुरुषाचे सांगली शहरांमध्ये पूर्णाकृती पुतळा लवकरच उभा करणार अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पुष्पराज चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागासवर्गीय सेलच्या महिला जिल्हाध्यक्ष मा सौ सुरेखाताई सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करताना राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले .
या वेळेला दलित मित्र पुरस्कार प्राप्त प्राध्यापक अशोक पवार सर, युवा नेते अर्जुन मजले , गॅब्ररील तीवडे. राष्ट्र विकास सेनाचे प्रवक्ते प्रशांत सदामते, शांतीनगर कबड्डी मंडळाचे अध्यक्ष मेजर आकाश तीवडे,अमर मगदूम, सुरेखा हेगडे, सुजाता हेगडे,नितीन माने ,आबा हेगडे, राहुल हिरामणी,लखन वारे, मार्तंड लोंढे, व इतर पदाधिकारी उपस्थित राहून सुरेखा ताई सातपुते यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी पुतळा उभा करण्याचा निर्धार घेतला शेवटी अमर मगदूम याने आभार मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.