उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 21, : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2.15 वाजता कोल्हापूर निवासस्थान येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता आगमन व महिला मेळाव्यास उपस्थिती, स्थळ - विजय चौक, पंचमुखी मारूती रोड, सांगली. सायंकाळी 4.15 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात विकलांग व्यक्तींना सेवा पंधरवडा निमित्त सायकल वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4.45 वाजता वालनेसवाडी येथील बाळूमामा मंदिर कंपाऊंड वॉलच्या उद्घाटनास उपस्थिती.
सायंकाळी 5.15 वाजता दिपक माने यांच्या निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट, स्थळ - संजयनगर, सांगली. सायंकाळी 5.45 वाजता साई मंगल कार्यालय वारणाली येथे आगमन व विधवा महिला मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता मिरज गांधी चौक येथील चौकाचे सुशोभिकरण कामाच्या शुभारंभास उपस्थिती. सायंकाळी 6.45 वाजता मिरज येथील शाहू चौक (हिरा हॉटेल) चौकाचे सुशोभिकरण उद्घाटनास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता मिरज येथील किसान चौक सुशोभिकरण कामाच्या शुभारंभास उपस्थिती. सायंकाळी 7.15 वाजता मिरज शांतीनगर सोसायटी ओपन स्पेसचे उद्घाटनास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता मिरज येथील लोंढे कॉलनी मधील चिल्ड्रन पार्क कामाच्या शुभारंभास उपस्थिती. सायंकाळी 7.45 वाजता सुरेश आवटी यांच्याज निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ - मंगळवार पेठ मिरज. रात्री सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व मुक्काम.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.