Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवारा बांधकाम कामगार संघटना

निवारा बांधकाम कामगार संघटना 



2 ऑक्टोबर 2022 रोजी सांगली महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर आत्मक्लेष लाक्षणिक उपोषण मेळाव्याच्या सुरुवतीला  शहीद भगतसिंग जन्मदिनानिमित्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  मेळाव्यास सुरुवात झाली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुमन पुजारी होत्या. 

सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार, महानगरपालिका क्षेत्रातील बेघर व ग्रामीण भागातील नोंदीत बांधकाम कामगार ज्यांना घर पाहिजे अशा सर्व कामगारांच्या वतीने 2 ऑक्टोबर 2022 रोजी सांगली महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर आत्मक्लेष लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. सन 1994 सालामध्ये सांगलीतील बेघरांना  घरासाठी जमीन द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, याबाबत अधिक माहिती देताना कॉ शंकर पुजारी यांनी मेळाव्यामध्ये सांगितले की, 1994 सालापर्यंत सांगली नगरपालिकेकडे 44 एकर जमीन बेघराना देण्यासाठी शिल्लक होती. नंतर बहुतांश जमीन चोरीला गेली. यानंतर मुंबई उच्च न्यायालय मार्फत बेघनांना घरे देण्याचा निकाल तीन वर्षांपूर्वी  झाला. त्यातील 357 बेघरांना घरकुले देण्यात येतील असे महापालिकेने दोन महिन्यापूर्वी आम सभेमध्ये निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अद्याप केली नाही म्हणून मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार घरकुले मिळावेत या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.



सांगली जिल्ह्यामध्ये 65 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पैकी हजारो बांधकाम कामगारांना घरासाठी  जमीन उपलब्ध नाही त्यांना जमीन उपलब्ध युद्धपातळीवर करून द्यावी आणि शासकीय जमीन, पड जमीन, वन खात्याची जमीन व गायरान मध्ये ज्यांनी  घरे बांधलेली आहेत त्यांचे शासकीय आदेशानुसार घरे नियमाकुल करावित या मागणीसाठी सांगली महात्मा गांधी पुतळा समोर स्टेशन चौक येथे आत्मक्लेष लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करीत असताना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 230 घरकुले मिरजेत बांधणारे बिल्डर श्री विनायक गोखले यांनी मार्गदर्शन करून प्रत्यक्षात बांधकाम कामगारांना 90 फ्लॅट्स मिळण्याची कारवाई सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री संदीप राजोबा यांनी सांगितले की, नागरिकांना आपला निवारा हक्क मिळवून घेण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. म्हणून 2 ऑक्टोबर रोजीच्या  उपोषणामध्ये कामगारांनी मोठ्या प्रमाणात भागीदारी करावी असे त्यांनी आवाहन केले. मेलाव्यामध्ये निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी  प्रा. शरयू बडवे यांनी प्रास्ताविक केले. 

तसेच विशाल बडवे, संतोष बेलदार, शाबिरा शेरकर, अमोल माने, बाळासाहेब कोल्हे, देवाप्पा राठोड, विद्या कांबळे, रोहिणी कांबळे, सुजाता चव्हाण, सना मुल्ला,रोहिणी खोत, आदिती कुलकर्णी, अजित खटावकर, लक्ष्मी कारंडे, हरी पाटील, बाळासाहेब वसगडेकर, सुरेश सुतार व  सिकंदर शेरेकर इत्यादींनी कामगारांच्या मेळावा मध्ये चर्चेत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.