Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोकरी मुंबईत आणि इंटरव्ह्यू चेन्नईत, एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा अजब कारभार!

नोकरी मुंबईत आणि इंटरव्ह्यू चेन्नईत, एकनाथ शिंदे यांच्या खात्याचा अजब कारभार!

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील एक लाख नोकऱ्यांची संधी गेली. बल्क ड्रग पार्क दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे 80 हजार रोजगाराच्या संधी हुकल्या. आता वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी नोकरभरती होत आहे, पण मुंबईतल्या या प्रकल्पासाठी राज्यात मुलाखती न घेता चेन्नईमध्ये 'वॉक इन इंटरव्ह्यू' होणार आहेत. देशभरातून नोकरीची स्वप्न घेऊन तरुण-तरुणी महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रातील सुशिक्षितांना या नोकरभरतीमध्ये संधी का नाही, असा खणखणीत सवाल शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. रोजगाराच्या संधी हिरावून ईडी सरकारकडून महाराष्ट्रातील तरुण-तरुणींचे आर्थिक खच्चीकरण होत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

नव्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्यातील वेदांता फॉक्सकॉन आणि रायगडमधील बल्क ड्रग पार्क दुसऱ्या राज्याने पळवल्याचे वास्तव आदित्य ठाकरे यांनी मांडले होते. आता मुंबईतल्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या प्रकल्पासाठी नोकरभरती चेन्नईत होत असल्याचा धक्कादायक प्रकार आदित्य ठाकरे यांनी उघड केला आहे.

अजून सरकारकडून उत्तर नाही

वेदांता फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला, याचे सरकारकडून अजूनही अधिकृत उत्तर आलेले नाही. हे दोन्ही प्रकल्प हातातून निघून गेल्यानंतर आता मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. ते महाराष्ट्र राज्यासाठी गेले आहेत की स्वतःसाठी गेले आहेत, हे आम्हाला माहिती नाही. पण आता तरी मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी होणाऱ्या नोकरभरतीकडे लक्ष द्यावे. कारण एमएसआरडीसी खाते गेली सात वर्षे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.