Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकनाथ खडसेंची घरवापसी अशक्‍य - पवार

एकनाथ खडसेंची घरवापसी अशक्‍य - पवार


जळोची : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची घरवापसी अशक्‍य आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. कोणतेही मंत्री अथवा कोणतेही लोकप्रतिनिधी कोणालाही कामानिमित्त भेटू शकता, अशी पुष्टी जोडत घरवापसीसारख्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, या चर्चेवर पवार यांनी पडदा टाकला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली. त्यावर खडसे यांनी स्वतः खुलासा दिला आहे. यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

पवार पुढे म्हणाले, खडसे यांनी घरवापसीबाबत स्वतः प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. कोणतेही मंत्री, लोकप्रतिनिधी कोणालाही कामानिमित्त भेटतात. यामध्ये उद्या मी विरोधी पक्षनेता आहे, कामानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला गेलो. हे माझे काम आहे. अन्य मंत्र्यांना भेटलो तर आम्ही भेटू शकत नाही का? मी सरकारमध्ये असताना मी उपमुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार मला भेटण्यासाठी येत होते.

आम्ही ज्या पक्षातून निवडून येतो. त्या पक्षाचे पदाधिकारी नसतो, संघटनेचा पदाधिकारी असतो. मात्र, सरकारमध्ये ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतात. सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे, गैरसमज निर्माण करता कामा नये. राष्ट्रवादीत कोणीही नाराज नाही. आमचे नेते जे ठरवतात, त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करीत आहे.

वेळेत कान टोचले पाहिजेत

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्‍तव्यावर पवार म्हणाले, आमदार, खासदार, मंत्री असो सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाचे असो. त्यांनी आपण राज्याचे, मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचे भान ठेऊन बोलावे. वडिलधाऱ्यांची शिकवणीचा विसर पडता कामा नये. असा कोणताही चुकीचा सल्ला देऊ नये, ही आपली संस्कृती नाही. वरिष्ठांनी वेळेत कान टोचले पाहिजेत, असा चिमटा त्यांनी काढला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.