महामंडळ अधिवेशनातील नामकरणे स्वातंत्र्यसैनिक शिक्षण महर्षी यांची स्मृती जपणारे राष्ट्रीय भान रावसाहेब पाटील
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे भव्य अधिवेशन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी सांगली येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटक दिल्लीचे उपमुख्यमंत्री माननीय ना मनीष सिसोदिया असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना दीपक केसरकर व कामगार मंत्री मा सुरेश भाऊ खाडे हे उपस्थित राहणार आहेत.
सांगली धनंजय गार्डनवर भरणाऱ्या या अधिवेशनात महाराष्ट्रातून सुमारे 5000 शिक्षण संस्था प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव संपन्न झाला तसेच मंडळाची पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे या घटना लक्षात घेऊन अधिवेशनात थोर स्वतंत्र सैनिक व शिक्षण महर्षीना भावपूर्ण अभिवादन करून त्यांची अखंड स्मृती जपून राष्ट्रीय भान म्हणून पुढील प्रमाणे नामकरणे करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नावाने "पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील महानगर”, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नावाने "पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी महाद्वार”, स्वर्गीय जी डी बापू लाड यांच्या नावाने "क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सभागृह”, शिक्षण महर्षी स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या नावाने "शिक्षण महर्षी डॉ पतंगराव कदम शैक्षणिक महाव्यासपीठ” व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर अण्णांच्या नावे "पद्मभूषण कर्मवीर डॉ भाऊराव पाटील अन्नपूर्णा महाकक्ष ".
या अधिवेशनासाठी राज्यभरातून लोक येणार आहेत त्यांच्या अंतकरणाच्या महापुरुषांची स्मृती कायम जपता यावी व नव्या पिढीला यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने ही नामकरण केली आहेत. अस या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सांगितले महामंडळाचा हा उपक्रम राष्ट्रीय भान जपणारा आहे असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.