भ. आदिनाथांची १०८ फुटी नयनमनोहारी मूर्ती साकार करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार हा माझा सर्वात मोठा सन्मान..!! -रावसाहेब पाटील
भ. महावीर २५०० वा मुक्ती महोत्सव मंडळ डोंबिवली मुंबई यांच्या वतीने आज त्यांचा राज्यस्तरीय भ.महावीर पुरस्काराने प्रसिद्ध अभियंता सी. आर. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन मुंबई येथे राज्यस्तरीय भ. महावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अभियंता सी. आर. पाटील होते.
रावसाहेब पाटील पुढे म्हणाले, 'दक्षिण भारत जैन सभा ही गेली १२२ वर्षे जैन समाजाच्या सर्वागीण उन्नतीसाठी काम करत आहे.या सभेचे १०० आजीव सभासद व्हा व प्रगती जिनविजयचे ही वर्गणीदार व्हा. दक्षिण भारत जैन सभेच्या एकाच छताखाली जैन समाज संघटीत झाला तर समाजाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होणार आहे.'
अध्यक्षीय भाषणात सी. आर. पाटील म्हणाले,' रावसाहेब पाटील यांचे दक्षिण भारत जैन सभा, शैक्षणिक, आर्थिक, सहकार क्षेत्रातील कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांचे दातृत्वही मोठे आहे.ते अहिंसक व परोपकारी आणि निष्कलंक चारित्र्याचे आहेत त्यांच्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला निश्चितच मिळेल.
यावेळी सौ. कांचन पाटील, पुत्र सागर, मंडळाच्या अध्यक्ष सौ. संगिता सतिश पेटकर, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, सेक्रेटरी अरुण जैन, खजिनदार राजेंद्र देशमाने,पंकज उपाध्ये जैन समाजातील मान्यवर श्रावक व श्राविका आणि युवा वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.