वारांगणांसाठी कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
सांगली, दि. 21, : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सुंदरनगर सांगली येथे वारांगणांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये त्यांना कायदेविषयक माहिती सोबतच शिक्षण, आरोग्य, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, मुलांचे हक्क तसेच त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेस जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत, जिल्हा पर्यावेक्षक प्रमोद संकपाळ, महिला व बाल विकास विभागाच्या कायदेशीर सल्लागार दिपीका बोराडे, नगरसेविका अनारकली कुरणे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, गणेश ओंबासे, लिगल एड चे ॲड. फारुक कोतवाल, ॲड. शोभा पाटील, श्री. आंबेकर, पोलिस विभागाच्या आर. के. क्षीरसागर व श्रीमती गोडबोले, एड्स निर्मुलन केंद्र सुंदरनगर चे दीपक चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सुंदरनगर मधील वारांगणा व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.