प्रकाश आंबेडकरांचे ईडीच्या कार्यपद्धतीवर बोट..
दोषी किंवा निर्दोष ठरवण्यासाठी न्यायालये आहेत. न्यायालयाला न्यायालयाचे करू द्या. कुणाला पकडायचे असेल त्याला ईडीने जरूर पकडावे, पण दोन महिन्यात त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोणत्याही सुनावणी शिवाय किंवा गुन्हा सिद्ध न होता चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं योग्य नाही. याला घटनाही मान्यता देत नाही, अशी टीका वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकतांच्या र्बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सध्या देशाची राजेशाही, हुकुशाहीकडे वाटचाल सुरू आहे. पंडित नेहरुंनी कबुतरे सोडली होती. ती शांतीसाठी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्ता सोडला. यापूर्वी सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या या सगळ्याच्या माध्यमातून भीती दाखवली. आत्ता तर मोदींनी चित्ता सोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
रिझर्व बँकेच्या गव्हर्नरने दोन महिन्यापूर्वी एक आपला अहवाल सादर केला आहे. त्यात असं म्हटलं आहे की, अंदाधुंदपणे पद्धतीने हे सरकार सरकारी मालमत्ता विकत आहे. हे देशाच्या हिताचे नाही. सुमारे सहा महिन्यापूर्वी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हा आरोप केला होता. त्यावर रिझर्व बँकेने आता शिक्कामोर्तबच केले आहे, असेही ते म्हणाले. सध्या देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे असे माझे स्पष्ट मत आहे. ईडी, सीबीआय यांची भीती दाखवून देश चालवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी आता चित्ता आणून चित्याची भीती दाखवण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोपी त्यांनी यावेळी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.