Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू

मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू


सांगली, दि. 19,  : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह पलूस, चिंचणी (ता. कडेगाव) व विजयनगर सांगली येथील वसतिगृहात मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अपंग, अनाथ, आर्थिक मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग इत्यादिंना प्रवर्गनिहाय व गुणवत्तेनुसार इयत्ता 8 वी, 11 वी व प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीसाठी मोफत प्रवेश सुरू आहेत.  अशी माहिती संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका यांनी दिली.

प्रवेशासाठी अर्ज वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध आहेत. तसेच  वसतिगृहात निवास,  भोजन व्यवस्था,  शालेय साहित्य (वह्या, पुस्तके, स्टेशनरी), शालेय गणवेश दोन नग, रेनकोट/छत्री/गमबुट मोफत आहे. मासिक निर्वाह भत्ता 600 रूपये, सहल खर्च 2 हजार रूपये इतका आहे. प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहाच्या अधिक्षिका यांच्याशी संपर्क साधावा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.