Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत अट्टल चोरट्याला अटक

सांगलीत अट्टल चोरट्याला अटक


एलसीबीची कारवाई, दोन गुन्हे उघडकीस, चोरीची रोकड, मोटारसायकल जप्त

सांगली: बॅंकेत कामासाठी येणाऱ्या लोकांची काही तरी बहाणा करून फसवणूक करून त्यांच्याकडील रोकड लुटणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली. कुबार्नअली इराणी (वय ३८, रा. सह्याद्रीनगर) असे त्याचे नाव आहे. एलसीबीच्या पथकाने कुपवाड सूतगिरणी-मिरज रस्त्यावर गुरुवारी ही कारवाई केली. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

दि. १२ सप्टेंबर रोजी आपटा पोलिस चौक परिसरातील युनियन बॅंक एकजण आले होते. त्यावेळी इराणी तेथे गेला. त्याने तेलकट नोटा बदलून घे असे म्हणून त्याच्या हातातील १६ हजार रूपये स्वतःकडे घेतले. हातचलाखी करून त्यातील साडेसातहजार रूपये काढून घेतले. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास एलसीबीचे पथक करत होते. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांना खबऱ्याद्वारे इराणी मिरज रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार गुरूवारी पथकाने सापळा रचून इराणी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात चोरीचे १३ हजार पाचशे रूपये सापडले. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मागर्दशर्नाखाली निरीक्षक शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, जितेंद्र जाधव, संदीप पाटील, सागर टिंगरे, विक्रम खोत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.