एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार?
एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगत भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच खडसे हे भाजप मध्ये जाणार असल्याची शक्यताही व्यक्त केली होती, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर खडसे खरचं भाजप मध्ये जाणार का? अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे
खडसेंचे भाजपा नेत्यांसोबत जवळचे संबंध?
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेतील भाषणात खडसे अमित शहांच्या भेटीबद्दल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर खडसे पुन्हा भाजप मध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना, एकनाथ खडसे यांनी आपली आणि अमित शहा यांची भेट झाल्याचं मान्य केले होते, मात्र खडसेंचे अनेक वर्षांच्या पासून अमित शहांसह भाजपा नेत्यांसोबत जवळचे संबंध असल्याचं म्हटलं होतं, शिवाय ते देशाचे गृहमंत्री देखील असल्याने त्यांची भेट घेतली होती आणि घेत राहणार असल्याचे म्हटलं होतं, त्यांच्या या भेटीचा आणि वक्तव्याचा त्यांच्या विरोधकांनी खडसे भाजपमध्ये जाणार असल्याचा प्रचार सुरू केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे
अमित शहांसोबत केवळ फोन वर चर्चा - रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे यांना याबाबत विचारले असता त्यांनी एकनाथ खडसे आणि आम्ही अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याच मान्य केले. मात्र शहा यांच्या व्यस्त कामामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, केवळ फोन वर चर्चा झाली, मात्र विरोधक त्यांच्या हिशोबाने राजकारण करीत त्याचा अर्थ लावत आहे, या व्यतिरिक्त खडसे भाजपामध्ये येणार का? याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. ते राष्ट्रवादीत आहेत, तर मी भाजप मध्ये असल्याचं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.