Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘रिझर्व्ह बँक’ऐवजी ‘रिव्हर्स बँक’ छापलेल्या २ हजारांच्या २५ कोटी मूल्याच्या नोटा जप्त...

‘रिझर्व्ह बँक’ऐवजी ‘रिव्हर्स बँक’ छापलेल्या २ हजारांच्या २५ कोटी मूल्याच्या नोटा जप्त...


गुजरात पोलिसांची अहमदाबाद-मुंबई मार्गावर कारवाई ‘रिझर्व्ह बँक’ऐवजी ‘रिव्हर्स बँक’ छापलेल्या २ हजारांच्या २५ कोटी मूल्याच्या नोटा जप्त; गुजरात पोलिसांची अहमदाबाद-मुंबई मार्गावर कारवाई

गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना खोट्या नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या चलनी नोटांचे मूल्य २५ कोटी ८० लाख रुपये इतकं आहे. विशेष म्हणजे या नोटा चलनी असल्याचं एका छोट्याश्या चुकीमुळे पोलिसांच्या लक्षात आलं आहे ही कारवाई करण्यात आली.

गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी या कारवाईसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवलं आणि तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या पोलिसांना आढळून आल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.