वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकासाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 29, : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण हा घटक पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याच्या आकारमाननिहाय अनुदान देय आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी शेततळ्याच्या आकारमाननिहाय 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त देय अनुदान पुढीलप्रमाणे. 15 x 15 x3 मीटर - 28 हजार 275 रूपये, 20 x 15 x3 मीटर - 31 हजार 598 रूपये, 20 x 20 x3 मीटर - 41 हजार 218 रूपये, 25 x 20 x3 मीटर - 49 हजार 671 रूपये, 25 x 25 x3 मीटर - 58 हजार 700 रूपये, 30 x 25 x3 मीटर - 67 हजार 728 रूपये. 30 x 30 x3 मीटर - 75 हजार रूपये.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.