Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल परब यांच्यावर कारवाई होणारच; किरीट सोमैया यांचा दावा

अनिल परब यांच्यावर कारवाई होणारच; किरीट सोमैया यांचा दावा


जुलै, 2018 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या शपथप्रत्रात अनिल परब यांनी दापोली रिसॉर्ट, दापोली रिसॉर्टच्या जमीनीचे आर्थिक व्यवहार झाले असल्याचे घोषित केले होते. मूळ जमीन मालक विभास साठे यांच्याकडून एक कोटी रुपये देऊन दापोली रिसॉर्टची मुरुड गावातली जमीन विकत घेतले असल्याचे अनिल परब यांनी आपल्या निवडणुकीच्या मालमत्ते मध्ये लिहले होते. या संबंधी अनिल परब यांचे सहकारी सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्याची सोमवरी सुनावणी होणार आहे. त्यात भाजप डॉ. किरीट सोमैया यांनी हस्तक्षेप अर्ज  दाखल केला आहे. सोमवारी सदानंद कदम यांच्या याचिकेसोबत आता किरीट सोमैया यांच्या इंटरवेंशन याचिकेची सुद्धा सुनावणी होणार.

महावितरण यांनी किरीट सोमैया यांना दिलेल्या माहितीत अनिल परब यांनी या रिसॉर्टच बांधकाम करण्यासाठी 3 फेज मीटर वीज जोडणी 05.03.2020 रोजी घेतली होती अशी माहितीही दिली आहे. या मीटरच्या वीज पुरवठ्या प्रमाणे मार्च 2020 ते मार्च 2021 पर्यंत या रिसॉर्टच बांधकाम गतीने करण्यात आल्याचे दिसत आहे. या 12 महिन्यांत वीजेचे बिल अनिल परब यांच्याच नावाने येत होते, अनिल परब स्वतःच्या बँक खात्यातून वीज देयकाचे भरणा करत होते. 04.03.2021 रोजी या वीज जोडणीचे सदानंद कदम यांच्या नावे हस्तांतरण करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे. 26.06.2019 रोजी अनिल परब यांनी स्वतःच्या सहीने मुरुड ग्रामपंचायत, दापोली येथील सरपंच यांच्या नावाने पत्र दिले होते, विभास साठे कडून दापोली साई रिसॉर्टची जमीन अनिल परबने घेतली व त्यावरील रिसॉर्ट, व्यावसायिक बांधकाम अनिल परबच्या नावे करण्यात यावे असा अर्ज ही दिला होता.

या रिसॉर्टची वर्ष 2019-20 ची घरपट्टी 14.11.2019 रोजी रु.46,806 अनिल परब यांनी स्वतःच भरली होती. वर्ष 2020-21 ची रु.46,806 घरपट्टी ही 17.12.2020 रोजी अनिल परब यांनी भरली होती, यांच्या पावत्याही आमच्या कडे उपलब्ध आहे असे सोमैया यांनी सांगितले. दापोली रिसॉर्टच्या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांनी राष्ट्रीय हरित लवादा  येथे दाखल केलेल्या शपथपत्रात  स्पष्टपणे म्हटले आहे की त्यांनी जमीन मे/जून 2017 मध्ये अनिल परब यांना विकली व त्याचा ताबा दिला. त्यावरील सर्व बांधकाम हे अनिल परब यांनी केले असल्याचे हे त्यांनी म्हटले आहे.

सदानंद कदम यांनी 27.01.2021 रोजी मुरुड ग्रामपंचायत यांना दिलेल्या अर्जात स्पष्टपणे म्हटले आहे की गाव मुरुड, गट क्र. 446 वरील मालमत्ता क्र. 1074 म्हणजेच साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचे नावे असून ते आता त्यांनी अनिल परब कडून विकत घेतले असल्याने सदानंद कदम यांच्या नावाने करावे असा आग्रह केला होता. भाजप किरीट सोमैया यांनी स्पष्ट केले आहे की, अनिल परब यांनीच दापोली येथील साई रिसॉर्टची जमीन विकत घेतली, ताबा घेतला, त्यावरील संबंधित बांधकाम, बिनशेती परवानगी (NA) करीता अर्ज त्यांच्याद्वारेच करण्यात आले, त्यावरील बांधकाम त्यांनीच केले, त्याची घरपट्टी, मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या खात्यातून भरली, कोविड लॉकडाऊन मध्ये या रिसॉर्टचे बांधकाम गतीने करण्याचे काम सुद्धा अनिल परब यांनीच केले. अनिल परब यांच्यावर कारवाई होणारच!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.