नगररचनाची खाबुगिरी—भाग १
मनपाच्या नगररचनाची खाबुगिरी चव्हाट्यावर प्राथमिक एनएसाठी वकिलाकडूनच घेतले लाखो रूपये
सांगली: शहरातील नामांकित वकील अड. चैतन्य कुलकणीर् यांची माधवनगर रेल्वे स्टेशनसमोर जमीन आहे. त्या जमिनीचे प्राथमिक एनए करण्यासाठी मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी, कमर्चाऱ्.यांनी त्यांच्याकडून लाखो रूपये उकळले आहेत. आयुक्तांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांची नावे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. नगररचनामधील श्री. मंगळवारे, श्री. डोळे, श्री. झगडे यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप अड.
कुलकणीर् यांनी केला आहे. सुरुवातीला या तीनही लोकांनी अड. कुलकणीर् यांच्याकडे या कामासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर कुलकणीर् यांनी त्यांना साडेसात लाख रूपये या कामासाठी दिले. ही रक्कम तीनही लोकांनी जावेद मकानदार याच्यामाफर्त स्विकारल्याचा आरोपही अड. कुलकणीर् यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मनपाच्या आयुक्तांसह पोलिस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, नगररचना विभाग, नगरविकास मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. त्यामुळे मनपाच्या नगररचना विभागातील अधिकारी, कमर्चाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अड. कुलकणीर् यांच्या तक्रारीमुळे मनपाच्या नगररचना विभागाची खाबुगिरी चव्हाट्यावर आली आहे. नगररचनाच्या खाबुगिरीची मालिका आजपासून सांगली दपर्णवर सुरू करीत आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.