Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेमध्ये कर्मवीर आण्णांना अभिवादन कर्मवीरांची विचार धाराच देशात शैक्षणिक क्रांती करेल

कर्मवीर पतसंस्थेमध्ये कर्मवीर आण्णांना अभिवादन कर्मवीरांची विचार धाराच देशात शैक्षणिक क्रांती करेल


सांगली :- कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगली व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करणेत आली. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. कर्मवीर पतसंस्था सांगली व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट, सांगली या दोन्ही संस्था कर्मवीर आण्णांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन काम करीत आहेत. गेली अनेक वर्ष या संस्थांच्या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तीना मदत केली आहे व समाज विधायक कार्य करीत असलेचे श्री. पाटील यांनी सांगितले.

कर्मवीर आण्णांनी समाज सेवेचा विचार मांडला तोच विचार कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था पुढे चालवित आहे. ध्यास घेतलेली माणसेच उच्चतम निर्माण करु शकतात. त्याच प्रमाणे कर्मवीर पतसंस्थेचे कार्य समाजासाठी प्रेरणादाई असल्याचे त्यांनी सांगितले, कर्मवीर आण्णांच्या आदर्शाशिवाय समाजास तरणोपाय नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वेलनकर अनाथ बालकाश्रम सांगली यांना व वृध्दसेवाश्रम सांगली या संस्थांना मदत म्हणुन प्रत्येकी रु. २५०००/- चा धनादेश कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ओ. के. चौगुले (नाना) व कार्यवाह श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला. या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी सिरिओलॉजीकल ब्लड बैंक सांगली यांचे सहकार्य लाभले.


यावेळी प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी कर्मवीर आण्णांवरील विचार मांडले. केवळ समाज विकासाच्या ध्येयाने झपाटुन विद्याथ्र्यांना कमवा व शिका हा मंत्र देवून देशासाठी मन आणि मनगटाने भक्कम असणारी उज्वल पिढी कर्मवीर आण्णांनी घडविली. आण्णांनी सर्वस्वाचा त्याग करुन कोणतीही वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता सामान्य जनांना शिक्षणाची द्वारे खुली केली. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना वसतीगृहात एकत्र आणुन त्यांना राष्ट्रीय एकात्मता शिकविली. कर्मवीर आण्णांचा आदर्श समोर ठेवुन त्यांच्या पाऊलखुणावर चालण्याचे कार्य संस्था करीत आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी अनाथ बालकाश्रमाच्या वतीने अधिक्षक डुबल मॅडम व वृध्दाश्रमाच्या वतीने श्री. आप्पासाहेब वालेकर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले व दिलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. तर ब्लड बँकेच्या वतीने कर्मवीर संस्थेस स्मृतीचिन्ह देवून आभार व्यक्त केले.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती भारती चोपडे संचालक अॅड. एस. पी. मगदूम डॉ. रमेश वसंतराव ढबू डॉ नरेंद्र खाडे तज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके) कर्मवीर ट्रस्ट चे ट्रस्टी डॉ. अशोक आण्णा सकळे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांचे सह सभासद सल्लागार, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार संचालक श्री. वसंतराव धूळाप्पाण्णा नवले यांनी मानले. सुत्रसंचालन संजय सासणे यांनी केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.