धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी राजे महाराजांचे स्मारक व्हावे मागणी..
सांगली 17 सप्टेंबर 22 :- साथीदार ग्रुपच्या वतीने महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये साथीदार ग्रुपच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, वारंवार धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी राजे महाराजांचे स्मारक व्हावे मागणी करूनही महापालिका प्रशासन यावर काही उत्तर देत नाही, म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून महापालिका प्रशासनाला आवाहन करत आहोत की पुढील आठ दिवसांमध्ये स्मारकासाठी जागा उपलब्ध न करून दिल्यास आम्ही आमच्या ग्रुपच्या वतीने पुतळ्याचे अनावरण करणार आहोत. पुढील जी कायदेशीर काही कारवाई होईल यासाठी सर्वस्वी महापालिका व आपण महापौर जबाबदार असाल असा इशारा साथिदार ग्रुपच्या वतीने महापालिका प्रशासन व महापौरांना देण्यात आला आहे,यावेळी ग्रुपच शिवतेज सावंत,विशाल दळवी,भोजराज दोलतोडे,ऋषिकेश भोई,वैभव दुर्गाले,सचिन सूर्यवंशी,अमेय पाटील,मनोज साळुंखे,आदर्श निकम,सुरज दाईगडे व आकाश माने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.